Posts

...एक प्रवास जो मला खूप काही शिकवून गेला...

माझ्या सध्याच्या ऐपती प्रमाणे मी रेल्वेचं सेकंड सीटरचं बुकिंग केलेलं होतं. सकाळी 6 वाजता माझा रेल्वेचा प्रवास सुरु झाला. बुकिंग असल्यामुळे मी निवांत होतो. प्रवास सुरु झाल्यानंतर मी जवळपास तासभर माझ्या आयुष्यातल्या अडचणींची उजळणी करत होतो तेंव्हा मला जाणीव झाली कि महिन्याच्या महिन्याला बरोबर ठराविक तारखेला पैसे भेटून, राहायला चांगल घर असून आणि दोन वेळच्या खाण्याची भ्रांत नसताना पण किती असमाधान आहे माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्याशी निगडित असलेल्या व्यक्तींना. आणि मग माझं विचारचक्र सुरु झालं. आपण या समाजाचं काहीतरी देण लागतो या विचारातून जो मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पीएचडी करण्याचा निर्णय घेतला आणि यात मी जे काम करतोय त्यात मला खूप समाधान भेटलं. भरून पावल्यासारखं वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं की आपण करत असलेल्या आणि भविष्यात करणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील कामामुळे मी माझ्या समाजाला काही तरी देऊ शकेल. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातल्या कमकुवत वर्गाला ताकदवान बनवेल आणि त्यांचा चांगलं शिक्षण घेण्याचा हक्क माझ्या परीने त्यांना मिळवून देण्यास मदत करेल. पण समाधानी राहील तो माणूस कसला. प्र...